Breaking News

ऍड.एम. एन. देशमुख महाविदयालयात नेट सेट कार्यशाळा संपन्न


राजूर/प्रतिनिधी

येथील अॅड्.एम. एन. देशमुख महाविदयालयात विदयार्थी विकास मंडळ व रसायनशास्त्र विभागामार्फत दोन दिवसीय नेट - सेट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी नेट किंवा सेट या पात्रता परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांचे निकाल अत्यंत कमी असतात . त्यामध्ये आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थाचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.त्यामुळे विद्यार्थांनी या पात्रता परिक्षांची तयारी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन व्हावे म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.बी.एस. देशमुख म्हणाले की सद्य परिस्थितीमध्ये स्पर्धा ही स्थानिक पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवर असते आणि म्हणून या परिक्षांना आपण पूर्ण तयारीने व आत्मविश्वाने सामोरे जाणे गरजेचे आहे. प्रा.पंकज नाईकवाडी, प्रा. डॉ.नरेंद्र फंटागरे, प्रा. सयाजीराव हांडे, प्रा. सामिन शेख, प्रा. प्रविण घारे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.व्ही.एन. गिते, व विद्यार्थी विकास मंडळ आधिकारी प्रा. संजय कडलग यांनी केले होते. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.शिंदे, प्रा.बांबळे, प्रा . लहू काकडे व रसायनशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थांनी परिश्रम घेतले.