महालक्ष्मी फौंडेशनतर्फे दहिवडीत रक्तदान शिबीर


दहिवडी (प्रतिनिधी) : विजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी फौंडशनतर्फे दहिवडी येथे आज रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

समाजाचे देणे व ग्रामीण भागातील गरजेच्या दृष्टीने रक्तदान करणे हे अतिशय महत्वाचे आहे. मायणी ब्लड बँक व महालक्ष्मी फौंडेशनच्या सहकार्यांने हे शिबिर झाले. याशिवाय विविध शाळांतील अपंग व अनाथ मुलांना खाऊवाटप करून अनाथांना माया व धीर देण्याचे कार्य महत्त्वाचे असुन ते अजरामर आहे. याशिवाय वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिरांचे आयोजन होणे सामाजिक बांधिलकीचा भाग आहे, असे मतही विजय जाधव यांनी या वेळी व्यक्त केले.

कार्यक्रमास माणगंगा पतसंस्थेचे चेअरमन सीताराम कदम, पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघ, श्री. दीक्षित, शिवाजी पाटील, माणदेश ट्रस्टचे अध्यक्ष जयराम शिंदे, गणेश कचरे, शिवाजी जाधव, दत्तात्रेय सावंत, रामभाऊ जाधव, आनंदराव सावंत, आपासाहेब जगदाळे, धनंजय जाधव, प्रमोद ननावरे, अमोल भोसले, पांडुरंग जाधव, रविकिरण माने, विनायक जाधव, अजिंक्य खांडे, बलदेव जाधव, शंकर हिंगळकर, सागर सावंत, साईनाथ जाधव व फौंडेशनचे सर्व संचालक उपस्थित होते.

आश्रमशाळा, अनाथाश्रम, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमाचे नियोजन करून खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप, होऊन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सर्व कार्यक्रमांना श्री. जाधव यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget