Breaking News

इंदोली येथे कार-ट्रकच्या अपघातात औरंगाबादचे दोन ठार


कराड,(प्रतिनिधी)  :  कोल्हापूर - पुणे महामार्गावर इंदोलीफाटा येथे पेट्रोल  पंपाजवळ पाठीमागून येणारी वेगनार चारचाकी गाडी क्रमांक (एम.एच 20 ईई 3144)  हिने पाठीमागून ट्रकला (जीए03बीबी6981) धडक दिली. त्यामध्ये दोनजण ठार तर चारजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना सकाळी सात वाजता घडली असून हे सर्व औरंगाबाद येथील आहेत.  

सदर अपघातात कारमधील विजय कळगुटकर (वय 30), पळहदबिन सुलतान (वय 35) हे ठार झाले आहेत तर शमीना खान (वय 40)या गंभीर जखमी झाले आहेत. शगुप्ता सय्यद (वय 26), हिना सय्यद (वय 6), अमीदी सय्यद (वय 12) हे किरकोळ जखमी असून जखमीना 108 अम्बुलन्सने सह्याद्री हाँस्पिटल कराड येथे पाठविण्यात आले आहे. सदरचा अपघातातील ट्रकचालक हा ट्रक घेऊन पळुन गेलेला होता मात्र त्याला भुईज पोलिसांनी पकडल्यची माहिती आहे.  वहातूक सुरळीत करणेत आली आहे.