Breaking News

यशवंतरावांचा वसा व आदर्श पी. डी. पाटील यांनी पुढे चालविला : डॉ. मोरे


कराड (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण साहेबांची साधी राहणी व उच्च विचारसरणी जोपासली. तोच आदर्श आदरणीय पी. डी. पाटीलसाहेबांनी पुढे चालवून कराडनगरीचा विकास केला. सलग 43 वर्ष नगराध्यक्ष पदावर विराजमान होवून आदर्श नेता, दूरदृष्टीचा नेता ही बिरुदावली प्राप्त केली. पी. डी. पाटील साहेबांसारखे अनेक विश्‍वासू कार्यकर्ते लाभल्यामुळेच चव्हाणसाहेबांना देशसेवा करण्याची संधी मिळाली. साहेब पंतप्रधान झाले असते तर या संबंध महाराष्ट्राला प्रचंड आनंद झाला असता. चव्हाणसाहेबांना जवळून पाहण्याची, ऐकण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य मानतो. खरे तर चव्हाणसाहेब हे महाराष्ट्राला पडलेले स्वप्न होते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडमध्ये यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय निबंध स्पर्धा व शिवाजी विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सन 2018-19 वर्ष 7 वे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी डॉ. मोरे, बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सदस्य अल्ताफ हुसेन मुल्ला होते. या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राज्य स्तरीय निबंध स्पर्धा व यशवंतराव चव्हाण शिवाजी विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धांना राज्यातील कानाकोपर्‍यातून अनेक स्पर्धंकांनी उत्स्फूर्तपणे विशेष भाग घेतला. या स्पर्धांमध्ये राज्याच्या कानाकोपर्‍यातून जवळजवळ 69 निबंध प्राप्त झाले होते. या निबंध स्पर्धेमध्ये खालील विद्याथ्यार्ंनी यश मिळविले.प्रास्ताविक प्रा.डॉ. सौ. कलमाडे यांनी केले.

जीपीएटी परिक्षेत गौरीशंकर देगांव फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) : एआयसीटीई नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय स्तरावरील घेण्यात आलेल्या जीपीएटी परिक्षेमध्ये गौरीशंकरचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी, देगांव सातारा या महाविद्यालयातील राणी शिंगाडे 95.86, सतिश महानवर 93.90, शिवानी मरडे 86.88, सम्राज्ञी माने 80.44 यांनी यश मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले.

या परिक्षेमध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थी यशस्वी होत आहेत. महाविद्यालयामध्ये त्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे. विद्यार्थ्याना प्राचार्य, डॉ. नागेश आलुरकर, उपप्राचार्य, डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. ई. टी. तांबोळी, प्रा. ए. एस. कदम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे गौरीशंकर संस्थेचे चेअरमन प्रा. मदनराव जगताप, व्हाईस चेअरमन मिलिंद जगताप, संचालक जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, डॉ. अनिरुध्द जगताप, प्रशासकिय अधिकारी नितीन मुडलगिकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन करून भविष्यातील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.