Breaking News

भारत आणि पाकिस्तानला संयम पाळण्याचा युनोचा सल्लानवी दिल्लीः पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. 

त्यानंतर पाकिस्ताननेही भारताला प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी दिली आहे. यातून या दोन देशांमध्ये झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आता संयुक्त राष्ट्रांनी भारत आणि पाकिस्तानला संयम पाळण्याचा सल्ला दिला आहे. 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा,' असे म्हणत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी भारत-पाकिस्तानला शांततेचे आवाहन केले आहे.