Breaking News

राष्ट्रीय मिल मजदूर संघाची गिरणी कामगार वसाहतीत आरोग्य तपासणी मोहीम


पाटण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने वरळी येथील सेंच्युरी मिल कामगार वसाहतीत तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत आरोग्य तपासणी मोहिमे अंतर्गत अस्थीव्यंग, न्युरो-नसांची मजबुती, मधुमेह, रक्तदाब, नेत्रचिकित्सा पार पडली.

संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी शिबिराचे उदघाटन केले. खजिनदार निवृत्ती देसाई, सेक्रेटरी लक्ष्मण तुपे आदी उपस्थित होते. सरचिटणीस गोविंदराव मोहिते,उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांच्या आयोजनाखाली मोफत आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. प्रजासत्ताकदिनी सातरस्ता येथील सिम्प्लेक्स मिल वसाहती पासून या मोहिमेला आरंभ करण्यात आला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ दहिसर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात जवळपास 275 कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ.संजय लोंढे, डॉ.प्रकाश भोसले, कुंदन राजभर या़ंचे आरोग्य तपासणीकामी सहकार्य लाभले. याप्रसंगी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत पेन्शन योजनेवर बजरंग चव्हाण यांनी माहिती दिली. राम भोसले, विष्णू तुरंबेकर, मारुती डोईफोडे, प्रकश दिघे, नरेंद्र गायकवाड, कानु मालुसरे, निवृत्ती जगताप, सर्जेराव कदम यांनी सहकार्य केले.