Breaking News

श्रीनिवास पाटील यांचा उद्या वाढदिवस


कराड(प्रतिनिधी) : सिक्किम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा 78 वा वाढदिवस सोमवारी (दि. 11) रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. श्री. पाटील हे नागरिक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी कराड येथील संपर्क कार्यालयात श्रीनिवास पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत.


सोमवारी सकाळी सात वाजता कराड येथील प्रितिसंगमावरील (कै.) यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेनउ वाजता मंगळवार पेठेतील (कै.) पी. डी. पाटीलसाहेब यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत अनुदा चेंबर्स येथील संपर्क कार्यालयात ते उपस्थित राहून हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत. दुपारी तीन वाजता गांधीटेकडी (ता.पाटण) येथील ठक्करबाप्पा विद्यालयाच्या नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना सायकल वाटप व पाटण तालुक्यातील शाळांना संगणक वाटप करण्यात येणार आहेत. मा.सारंग पाटील युवा विचार मंचच्या वतीने विभागातील शाळांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शुभेच्छा देण्यासाठी हार, गुच्छ न आणता शालोपयोगी साहित्य सोबत आणावे अथवा सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन संयोजक सिमितीच्यावतीने केल्याची माहिती स्वीय सहाय्यक दादासाहेब नांगरे यांनी दिली आहे.