Breaking News

उत्कृष्ट पुरस्काराने कराड नगरपरिषद सन्मानित


कराड (प्रतिनिधी) : सातारा नगरपरिषद, सातारा व सातारा नगरपरिषद शिक्षण समिती आयोजित (कै.) श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (दादा) कला, क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवामध्ये सातार्‍याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष दादामहाराज भोसले स्मृती उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार देवून कराड नगरपरिषदेस सन्मानित करण्यात आले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी कराड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी उमेश शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, जनशक्ती आघाडीचे गटनेते नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांचेसह सर्व समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचेसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.