Breaking News

वरवट बकाल येथे फटाके फोडून वायुदलाच्या कारवाईचे अभिनंदन


संग्रामपूर : पुलवामा हल्ल्याच्या कारवाईचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर  केलेल्या कारवाईचा मंगळवारी तालुक्यातील वरवट बकाल येथील बसस्थानक चौकात  नागरिकांनी फटाके फोडून व जल्लोष करत आनंद व्यक्त केला. 26 फेब्रुवारी  रोजी सकाळी भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कॅम्पवर हल्ला केला. या  हल्ल्याचा एकच जल्लोष करण्यात आला.

वरवट बकाल येथील बसस्थानक चौकात  नागरिकांनी एकत्र येऊन पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद, अशा  घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर फटाके फोडून सैन्य दलाचे  अभिनंदन केले. या वेळी तालुकाध्यक्ष नारायणराव ढगे, पंकज ठाकरे, प्रल्हाद  दातार, दुर्गासिंग सोळंके, सोनाजी वावरे, राजेश भरडक, संजय गावंडे, राजेश  गिरी, स्वप्निल वानखडे, अशोक मोरखडे, सत्यव्रत करांडे, राजेंद्र दाभाडे  आदी उपस्थित होते.