Breaking News

शिवसेनेतर्फे मेढा येथे आरोग्य शिबीर संपन्न


कुडाळ (प्रतिनिधी) : जावली तालुका शिवसेना व मेढा ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत सर्वरोग निदान आणि उपचार शिबीर संपन्न झाले. या शिबिराचा तालुक्यातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराचे उदघाटन माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, तहसीलदार रोहिणी आखाडे व पोलिस उपनिरीक्षक जीवन माने यांच्या हस्ते पार पडले. या वेळी शिवसेनेचे नेते एस. एस. पार्टे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्‍वनाथ धनावडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सचिन जवळ व विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख सचिन करंजेकर, प्रशांत तरडे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख जयश्री पवार, वासंती पाडळे, युवासेनेचे तालुकाप्रमुख आशिष भिलारे, सचिन शेलार आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये डोळे, कान- नाक-घसा, स्रीरोग, बालरोग, रक्तदाब, मधुमेह आदी आजारांचे एकूण 1,475 रुग्ण तपासून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. या शिबिरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. यादव, डॉ. भिसे, डॉ. रमेश कदम, डॉ. प्रथमेश विश्‍वासराव आदींचे विशेष सहकार्य लाभले.

या शिबिरावेळी गरजू रुग्णांना मोफत चष्मा वाटपही करण्यात आले. तसेच कायमस्वरूपी मिसरीचे व्यसन सोडण्याची शपथ घेतलेल्या महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानही करण्यात आला.