Breaking News

माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


सातारा(प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल ऍण्ड एज्युकेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती संस्थेच्या कार्यालयात साजरी केली.

कार्यक्रमाची सुरवात जागर अस्मितेच्या टीमने बाबासाहेब आणि रमाईंच्या गीतांनी केली. त्यानंतर कार्यक्रमाला वक्ते म्हणून लाभलेले प्रा. यशवंत भोरकडे यांनी माता रमाई यांचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर उभा केला.

तर रिपब्लिकन जनआंदोलनचे अध्यक्ष भागवत वीर यांनी कार्यक्रमात आंबेडकरी अनुयायांच्या ध्यानी नसलेल्या कणखर , स्वाभिमानी अशा माता रमाईंच्या नव्या पैलूंची ओळख उपस्थितांना करून दिली. तसेच बाबासाहेबांच्या आणि माता रमाईंच्या प्रेमाचा धागा उपस्थितांसमोर विशद केला. नितिन दिवेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.