बाह्यवळण रस्त्याचे रखडलेले काम सुरू करा - निंबळक ग्रामस्थांची मागणीबाह्यवळण रस्त्याचे रखडलेले काम सुरू करा - निंबळक ग्रामस्थांची मागणीv


अहमदनगर/प्रतिनिधी : “अनेक आंदोलने व पाठपुराव्याने सुरु झालेेले निंबळक बाह्यवळण रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून बंद पडलेले असून, रस्ता धुळीने माखल्याने अनेक अपघात होऊन नागरिकांना या भागात राहणे, शेती करणे व रस्त्यावरुन जाणे कठिण बनले असून, त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. येत्या सात दिवसात या रस्त्याचे काम सुरु न झाल्यास ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

निंबळक ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ.भा.चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, अजय लामखडे, शरद लामखडे, जगन्नाथ शिंदे, भानुदास शेळके, दीपक पंडित, मारुती गारुडकर, पोपट शिंदे, आबुज मेजर, राजाराम कोतकर, सचिन राठोड, गौरव संसारे आदी उपस्थित होते.

ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता चव्हाण यांना घेराव घालून, बाह्यवळण रस्त्याचे काम सुरु करण्याबाबत चर्चा केली. या रस्त्यासाठी 17 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून या कामासाठी ठेकेदाराला 6 कोटी अदा करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मात्र ठेकेदार उर्वरीत रक्कम मिळत नसल्याने काम थांबविल्याचे सांगत आहे.

ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तोडगा काढून ग्रामस्थांना वेठीस न धरता काम सुरु करण्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र कार्यकारी अभियंताकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. निंबळक बाह्यवळण रस्त्याचे काम निंबळक चौकापर्यंत खडी टाकून लेअर करण्यात आली आहे. एक वर्षापासून हे काम चालू होते. गेल्या दोन महिन्यापासून हे काम बंद पडले असून, निंबळक चौक ते विळदघाट पर्यंतचा रस्ता तसाच पडून आहे. अवजड मालवाहू वाहतुकीमुळे रस्ता पूर्णत: धुळीने माखला असून, सिग्नलची सोय नसल्याने अनेक अपघात घडत आहे. संबंधित ठेकेदार रस्त्याचे काम न करता धुळ उडू नये म्हणून दररोज टँकरने पाणी मारत असून, हा प्रकार थांबविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget