Breaking News

कराडमध्ये 12 हजार विद्यार्थ्याकडून शब्दसूरांजली


कराड / प्रतिनिधी : येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानतर्फे कराड शहरातील सुमारे12 हजार विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक व संगीतप्रेमींनी यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीदिनी शब्दसुरांची आदरांजली अर्पण केली.

आसावरी महाजन यांनी रचलेले व लयबध्द केलेले यशवंत गौरवगीत संगीता मुळे, वीणा घळसासी, संजीवनी देशपांडे, अनघा घळसासी, सौ. जोशी, सिमंतीनी तांबवेकर, डॉ. विश्र्वास धायगुडे, डि.एच. कुलकार्णी, श्रीधर घळसासी, महेंद्र जोशी यांनी सादर केले. त्यांना शुभदा पटवर्धन यांनी संवादिनीवर तर तबला साथ ज्ञानेश्र्वर कल्याणकर व अभिजीत भोपते यांनी केली.

हुसेन कासम दानेकरी अँग्लो उर्दू हायस्कूल, यशवंत हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, शाहीन हायस्कूल, विठामाता विद्यालय, श्रीशिवाजी विद्यालय, श्रीसंत तुकाराम हायस्कूल, दि. का. पालकर माध्यमिक शाळा, ऍकॅडमीक हाईटस्‌ पब्लिक स्कूल पाचवड फाटा, मलकापूर आदी शाळांतील सुमारे 12 हजार विद्यार्थिनींनी माझा देश, मी या देशाचा हे देशभक्तीपर गीत, इतनी शक्ति हमे दे ना दाता ही प्रार्थना व राष्ट्रगीत सादर करून, ’शब्दसुरांची आदरांजली’ वाहीली.

यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण सभापती राजेश पवार, जि. प. सदस्य मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती फरीदा इनामदार, उपसभापती सुहास बोराटे, शालन माळी, सत्यजित बडे, संतोष धोत्रे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाशबापू पाटील, सह्याद्रि साखर कारखान्याचे संचालक संजयकाका जगदाळे, भास्करराव कुलकर्णी, प्रभावती माळी, ऍड. मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, राजेंद्र माने, रेश्मा कोरे, प्रा. रामभाऊ कणसे, अबुबकर सुतार, नरेंद्र पवार, सुहेल बारस्कर, संभाजी पाटील, अंकुश पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. ए. डांगे यांनी केले