कराडला पालिका सभेत 14 विषयांना मंजूरी


कराड /प्रतिनिधी : स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल कराड नगरपालिकेचा देशाच्या पश्र्चिम विभागात प्रथम क्रमांक आला आहे. स्वच्छता अभियानात शहरातील नागरिक, नगरपालिकेचे कर्मचारी, नगरसेवक, विविध सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्यासह महिलांचे योगदान मोठे आहे. या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव व 14 विषयांना आज (शुक्रवारी) कराड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे होत्या.
कराड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगरपरिषदेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी बोलताना विनायक पावसकर म्हणाले, स्वच्छता अभियानात कराडचा नावलौकिक झाला आहे. परंतु यापुढेही शहरातील स्वच्छता टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे व सातत्य ठेवले पाहिजे. विशेषतः कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे यश मिळाले आहे.
विजय वाटेगावकर म्हणाले, शहरात एलईडी बल्ब किती बसवले याची गणना करणारी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. आवांतर मागणी वाढून जादा बल्ब बसविले तर मुळ उद्देश बाजूला पडेल. त्यामुळे ठेकेदाराने जर इतरत्र बल्ब बसविले असेल तर त्याचे रेकॉर्ड तयार करावे अशी सूचना मांडली. त्यावर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी या संदर्भात संबधित ठेकेदारांकडून आढावा घेवू असे आश्र्वासन दिले.
दरम्यान, विषय पत्रिकेवरील सर्व पंधरा विषयांना एकमतांने मंजुरी देण्यात आली. या सभेतील चर्चेत उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, विजय वाटेगावकर, राजेंद्र माने, विनायक पावसकर, फारूक पटवेकर, सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget