Breaking News

श्रीगोंदे शहरातील अवैध धंद्यावर धाडसत्र; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह 15 आरोपी जेरबंद


श्रीगोंदे/प्रतिनिधी
श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी मागील काही दिवसापासून रात्रंदिवस तालुक्यातील अवैध मटका जुगार गावठी दारू व्यवसायावर धाडसत्र सुरू केले असून दि.8 मार्च रोजी रात्री श्रीगोंदे शहरातील अवैध जुगार अड्ड्यावर व 9 मार्च रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदे फॅक्टरी व काष्टी येथील अवैध गावठी दारू बनवणार्‍या हातभट्ट्यावर धाड टाकून 15 जणांना अटक केली. तर लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.8 मार्च रोजी संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की, श्रीगोंदे शहरालगत श्रीगोंदे-आढळगाव रोडवर असलेल्या हॉटेल शांताईच्या पाठीमागील बाजूस तिरट नावाची जुगार पैशावर खेळत आहेत. अशी माहिती मिळताच पोलिस पथक पाठवले असता सदर ठिकाणी गणेश हरिभाऊ सप्रे (वय 25), शिवाजी लहू मडके (वय 32), सोमनाथ तुकाराम आवटी (वय 45), विनोद किसन अधुरे (वय 32) राहणार चोराचीवाडी, गणेश संजय मडके (वय 21) राहणार लोणी व्यंकनाथ (वय 21), महेश दगडू सप्रे (वय 27) अक्षय हरिभाऊ सप्रे (वय 24) हे तिरट नावाची जुगार पैशावर खेळताना आढळून आले. तसेच त्यांच्याकडे जुगाराचे साहित्य साधने व त्यांच्याकडील वाहने असे एकूण दोन लाख 32 हजार 170 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. दादासाहेब भाऊसाहेब हाके यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदे पोलिस स्टेशन हद्दीतील श्रीगोंदे कारखाना येथील गोपाळवस्ती व काष्टी येथील जामदार मळा येथे अवैध गावठी हातभट्टी दारु तयार करणा_र्‍या भट्टयावर छापा टाकला असता दरम्यान 2,02,000 रु किं.ची गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन व गावठी हातभट्टी दारु एकुण 3970 लिटर जागीच नष्ट करुन हातभट्टी दारु तयार करण्याचे साहीत्य सामुग्री जागीच नष्ट केली आहे. छाप्या दरम्यान आरोपी नावे-राहुल पोपट गव्हाणे, अविनाश संतोष पवार, अमोल जंबो गिर्‍हे, विमल जंबो गिर्‍हे, जंबो पंढरीनाथ गिर्‍हे, सुनिता अंकुश पवार रा.श्रीगोंदे कारखाना ता.श्रीगोंदे, संदीप पोपट्या पवार रा.जामदार मळा काष्टी अशांना ताब्यात घेवून त्यांचेवर मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर, पोलिस उपनिरीक्षक बोडके, सहाय्यक फौजदार भारती पोलिस हे.कॉ. बडे, पोलिस नाईक वैराळ, दादा टाके, रवी जाधव, किरण बोराडे, अमोल आजबे, देवकाते कोपनर बेलेकर महिला पो.कॉ. भंडलकर यांनी केली. असल्याची माहिती ठाणे अंमलदार संदीप पितळे यांनी दिली आहे.