Breaking News

कालेमधील नेत्रशिबीरात 1933 जणांची तपासणी


कराड/ प्रतिनिधी : काले (ता. कराड) येथे काल (मंगळवारी) मुंबईचे एम्पथी फाऊंडेशन व जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

येथील व्यंकनाथ मंदिरात सकाळी साडेनऊ ते दुपारी सुमारे चार वाजेपर्यंत हे शिबीर पार पडले. या शिबीरास काले व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाच वर्षाच्या बालकापासून ते वयोवृध्दांपर्यंत विविध वयोगटातील व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरामध्ये एक हजार 933 शिबीरार्थींनी सहभाग नोंदवला. या सर्वांची संयोजकांतर्फे नेेत्रतपासणी करण्यात आली. त्यामधील 898 जणांना जागेवरच चष्म्यांचे वाटप झाले. शिबीरार्थींपैकी 205 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तर 600 जणांवर औषधोपचार करण्यात आले. तसेच 230 जणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण व सौ. सत्वशिला चव्हाण यांनीही या शिबिरास सदिच्छा भेट दिली व शिबिराचा आढाव घेतला.

यावेळी कराड उत्तरचे जेष्ठ नेते मारुतीशेठ जाधव, कालेचे जेष्ठ नागरिक शामराव धोंडी पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, संयोजक पैलवान नानासाहेब पाटील, डॉ. अजित देसाई, डॉ. अशोक देसाई, श्री. डांगे, जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगलताई गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जखिणवाडीचे आदर्श सरपंच ऍड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, ओंडचे माजी उपसरपंच कृष्णत थोरात, सागर कुंभार, बाळासाहेब जावीर, नारायणवाडीचे उपसरपंच रणजीत देशमुख, एम्पथीचे प्रोजेक्ट मॅनेंजर दिनेश झोरे, समन्वयक संदिप दबडे, सांगली जिल्हा पुरवठा विभाग दक्षता समितीच्या सदस्या शबाना मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबीराच्या यशस्वीतेसाठी पैलवान नानासाहेब पाटील मित्र परिवारातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.