एकट्या सायकलस्वारांचा 210 किलोमीटरचा प्रवास
राजाचे कुर्लेतील रमेश माने यांचा व्यसनमुक्ती प्रसारासाठी अनोखा उपक्रम
पुसेसावळी / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले गावचे रहिवासी असलेले युवकमित्र रमेश माने हे ह.भ.प.बंडा महाराज कराडकर संस्थापक असलेल्या व्यसन मुक्त युवक महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. या संघटनेच्या माध्यामातून गेली 17 वर्षे समाजातील युवकांनी व्यसनापासून लांब रहावे म्हणून ते विविध उपक्रम राबवत आहेत ,
त्याचाच एक भाग म्हणून श्रीक्षेत्र देहु ते श्री क्षेत्र गिरिजाशंकरवाडी (राजाचे कुर्ले) अशा 210 किलोमीटरच्या सायकल फेरीमध्ये व्यसनमुक्त युवक हाच खरा समाजसुधारक व सायकल चालवा पर्यावरण वाचवा असा संदेश देत सायकलभ्रमंती करून गावी परतले आहेत.
या प्रवासादरम्यान विविध ठिकाणी भेटलेल्या युवकांना मार्गदर्शन करुन आपण आपला सर्वात जवळचा मित्र म्हणजे स्वत:चे शरीर असून ते जर व्यसनांपासून दूर ठेवले तर कोणतेही उद्देश गाठु शकतो, याबाबत एक संदेश देऊन युवकांना व्यसनापासुन दुर करण्याचे काम यातुन केल्याचा आनंद मिळतो त्याचबरोबर प्रवासावेळी अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले.
आजवर रमेश माने यांनी सर्वप्रथम दि. 26 जानेवारी 2019 ला प्रजासत्ताक दिनी पुणे ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई अशी सायकल फेरी केली. त्यानंतर दुसर्‍यांदा महाशिवरात्रीच्या दिवशी क्षेत्र देहु पुणे ते श्री क्षेत्र गिरिजा शंकरवाडी (राजाचे कुर्ले) अशी 210 किलोमीटरचा सायकल वरुन प्रवास करून रमेश माने यांनी अनोखी कामगिरी केली आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वजण आपले जीवन जगताना तसेच व्यावसायिक व नोकरीचा गाडा ओढत खर्‍या जीवनशैली विसरत चालले आहेत. जुन्या काळात काय होते त्याचा विसर पडायला लागला असुन माणुस व्यसनाधीन बनायला लागला आहे. म्हणुन आपण समाजासाठी काहीतरी करावे यासाठी या भावनेतुन हा उपक्रम राबवित आहे, अशी प्रतिक्रिया सायकलपटू रमेश माने यांनी दैनिक लोकमंथनशी बोलताना व्यक्त केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget