Breaking News

25 वर्षे आमदार म्हणून लोकांच्या मनावर राज्य : जाधव


अहमदनगर / प्रतिनिधी : “शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्यामुळेच त्यांची जनसामान्यांना 24 तास उपलब्ध होणारा नेता म्हणून ओळख असून 25 वर्षे आमदार म्हणून लोकांच्या मनावर राज्य केले, त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात येऊन त्यांची ‘म्हाडा’च्या संचालकपदी झालेली निवड ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे’’, असे प्रतिपादन नंदनवन मित्रमंडळाचे मार्गदर्शक बाबासाहेब जाधव यांनी केले.

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची ‘म्हाडा’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नंदनवन मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विशाल गणेश मंदिरचे पुजारी, संगमनाथ महाराज, सुवर्णा जाधव, सुरेखा कदम, मंगल लोखंडे, सुवर्णा गेनप्पा, सचिन शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, दत्ता जाधव, अशोक कानडे, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, दीपक भोसले, कपिल जाधव, वैजीनाथ लोखंडे, शरद कोके आदी उपस्थित होते.

प्रास्तविक दत्ता जाधव यांनी केले. याप्रसंगी सुवर्णा जाधव, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम आदींनी मनोगत व्यक्त केले.