Breaking News

उत्पादन शुल्कने केला 2 लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त


सातारा / प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सातारा विभागाने 2 लाख 6 हजार 411 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहलता श्रीकर यांनी दिली.

हणमंतवाडी (ता. फलटण) येथे बेकायदा हातभट्टी दारु वाहतूक व विक्रीवर छापे टाकून दोन दुचाकी वाहने व हातभट्टी दारुचा एकूण 47,850 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये मोहन उत्तम पाटोळे, (रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), गोरख भानुदास चव्हाण (गुरसाळे, ता. माळशिरस) यांना अटक करण्यात आली आहे. तर खंडाळा येथे बेकायदा गोवा बनावट विदेशी दारु वाहतूक पकडून चारचाकी वाहनासह गोवा बनावट विदेशी दारुचा एकूण 1,58,560 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये प्रभारी निरीक्षक एस. डी. शिलवंत, नितीन शिंदे, नितीन जाधव, सचिन खडे, अजित रसाळ, आर. एन. अवघडे, महेश मोहिते, जीवन शिर्के, अरुण जाधव, सागर साबळे यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी एस. डी. शिलेवंत अधिक तपास करीत आहेत.