Breaking News

ओडिशात महिलांना लोकसभेसाठी 33 टक्के उमेदवारी देणारः पटनाईक


भुवनेश्‍वरः ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या वतीने 33 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा केली. विशेष म्हणजे पटनाईक हे पूर्वीपासून संसद आणि विधानसभा निवडणुकीतही महिलांच्या आरक्षणाला समर्थन करत आले आहेत.

पटनाईक हे केंद्रपाडा येथील एका जाहीर सभेत बोलत होते. याचदरम्यान त्यांनी तिकिट वाटपात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची महत्वपूर्ण घोषणा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रपाडा येथे येऊन मोठा आनंद झाल्याचे सांगितले.

दरम्यान, पटनाईक यांनी यापूर्वी राज्य विधानसभेत संसद आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे.