Breaking News

बचत गटांच्या महिलांना 35 लाखांचे अर्थसहाय्य


अहमदनगर/प्रतिनिधी : “शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 35 बचत गटांमधील 175 महिला सभासदांना प्रत्येकी 20 हजार असे एकूण 35 लाख रुपयांचे अर्थसहाय्य अल्प व्याजदरात कर्जरूपाने उपलब्ध करून देण्यात आले’’, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

या अर्थसहाय्याचे धनादेश वितरण जिल्हा बँकेच्या चाहुराणा बुद्रुक शाखेत आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले, यावेळी बँकेचे नोडल अधिकारी रवींद्र गायकवाड, शाखाधिकारी महादेव कराळे, अरुण पंडित, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या रेश्मा आठरे, संगीता कुलट, किरण कटारिया, भारती भोसले, सुनंदा कांबळे, रजनी अमोदकर, अलिशा गर्जे, शोभा निमसे, बाबासाहेब गाडळकर, अफजल शेख आदी उपस्थित होते.ं
आ.जगताप पुढे म्हणाले, “ पूर्वी शहरातील 210 बचत गटांच्या 970 महिला सदस्यांना छोटे मोठे उद्योग व्यवसाय करण्यासाठी 38 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे, या कर्जातून शिवणकाम, कापड दुकान, ब्युटी पार्लर, स्टेशनरी विक्री दुकान, किराणा दुकान, चहा स्टॉल असे उद्योग सुरु करता येतील, महिला बचत गटांमार्फत कर्ज देवून महिलांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, महिलांचे बँकेशी नाते जोडले गेल्यामुळे त्यांची समाजात पत निर्माण होते, महिलांनीही या कर्जाची नियमित परतफेड करावी’’, असे त्यांनी सांगितले.