Breaking News

शोपियांमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्माश्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये बुधवारी रात्रीपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु होती. सीआरपीएफ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात गुरूवारी लष्कराला यश आले आहे. घटनास्थळावरुन जवानांनी मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

शोपियां जिल्ह्याच्या केल्लरमध्ये बुधवार रात्रीपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. रात्रभर सुरु असलेली चकमक गुरूवारी सकाळी संपली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्याचे मृतदेह सापडले. घटनास्थळावरुन मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जवानांना केल्लर भागामध्ये काही दहशवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर, सीआरपीएफ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुयंक्त कारवाई करण्यात सुरुवात केली. घटनास्थळाला घेराव घातल्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. दरम्यान झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच शोपियांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरु आहे.

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा आणि शोपियां जिल्ह्यामध्ये 23 मार्चला जवान आणि दहशतवाद्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता. या दहशतवाद्यांनी 12 वर्षाच्या मुलाला बंदी करुन ठेवले होते. त्यानंतर त्यांनी त्याची हत्या केली होती. गुरुवारपासून सुरु झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 8 झाली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा समावेश होता.