Breaking News

पाकिस्तानात जैशच्या 44 जणांना अटक; मसूद अझहरच्या भावाचा समावेश


दहशतवादी संघटनांविरूद्ध पाकिस्तानने कारवाई करायला सुरूवात केली आहे. ज्या संघटनांवर बंदी घालण्यात आली अशा संघटनांच्या 44 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुल रऊफ उर्फ हमदाचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने पाकिस्तानने आता काही संघटनांविरूद्ध कारवाईला सुरूवात केली आहे.

मात्र पाकिस्तानची ही कारवाई म्हणजे फक्त धुळफेक असल्याचं संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे. पुलवामा हल्ल्या प्रकरणी भारताने पाकिस्तानला जो पुरावा दिला होता त्यातही हमदाचं नाव आहे.