Breaking News

सातार्‍यात 48 हजाराची बेकायदेशीर देशी दारु जप्त


सातारा / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत बेकायदेशीर देशी दारुच्या सुमारे 48 हजार पाचशे रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी अजय बबन किर्तीकुडाव (वय 24) याला ताब्यात घेतले आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली असून यावेळी अजय किर्तीकुडाव हा देशी दारुच्या बाटल्यांची वाहतूक करताना आढळल्याने त्याच्याकडील 48 हजार 500 रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच किर्तीकुडाव याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाई बेकायदेशीर दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.