Breaking News

नीरव मोदीच्या पेंटिंग्सचा 55 कोटींना लिलाव


मुंबई : पीएनबी बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळ्यानंतर देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीच्या संपतीवर इडीने टाच आणली आहे. देशभरातील त्याच्या संपत्तीवर जप्ती आणण्यात आली असून, मंगळवारी त्याच्या 68 पेंटिग्सचा लिलाव करण्यात आला. आयकर विभागाकडून या पेंटिंग्सचा लिलाव करण्यात आला. 

पीएनबी बँकेत केलेल्या 13 हजार कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी आयकर विभागाला नीरव मोदीकडून 97 करोड रुपयांची वसुली करायची आहे. मंगळवारी झालेल्या लिलावातून आयकर विभागाला 59.37 करोड रुपये मिळाले आहेत. यानंतर निरव मोदीच्या महागड्या 11 गाड्यांचा लिलाव देखील करण्यात आला आहे. या पेंटिंग विक्रिसाठी आयकर विभागाने एका कंपनीची मदत घेतली होती. या कंपनीचे कमीशन देउन आयकर विभागाला 54.84 करोड रुपये मिळाले आहे. या पेंटिंग्समध्ये राजा रवि वर्मा, वीएस गायतोंडे, एफएन सूजा, जगन चौधरी, अकबर पद्मसी यांच्या पेंटिग्सचा समावेश आहे. यामधील वीएस गायतोंडे यांच्या पेंटिगला सर्वाधिक 25.24 करोडांची बोली लागली. 2015 साली याच पेंटिंगसाठी 29.3 करोडाची बोली लावण्यात आली होती. त्यावेळी ही देशातील सर्वात महागडी पेंटीग ठरली होती. मुंबईतील आर्ट ऑफ सेफ्रोनार्टमध्ये या पेंटिंग्सचा लिलाव करण्यात आला.

दरम्यान, नीरव मोदीवर उद्या 29 मार्चला लंडनच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. 13 मार्चला वेस्टमिंस्टर कोर्टाने त्याच्या अटकेचे वॉरंट काढले होते. या नंतर बुधवारी त्याला अटक करण्यात आली. कोर्टात होणार्‍या या सुनावणीसाठी भारतातून सीबीआय आणि ईडीची टिम बुधवारी रात्री रवाना होणार आहे. याआधी नीरव मोदीच्या वकीलांनी केलेली जामीनाची मागणी कोर्टाने यापूर्वीच फेटाळली आहे. उद्या होणार्‍या सुनावणीत नीरव मोदीचे वकील पुन्हा एकदा त्याच्या जामीनाची मागणी करणार आहेत. मनी लाँड्रिग प्रकरणी नीरव मोदीच्या भारतीय प्रत्यार्पणासाठी आता वेग येणार आहे.