Breaking News

कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या 6 लाख साखर पोत्यांचे पुजन


श्रीगोंंदे/प्रतिनिधी: कुकडी साखर कारखान्याचे चालू हंगामातील 6 लाख 66 हजार 666 साखर पोत्यांचे पुजन ओम गुरुदेव महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कुंडलीकराव जगताप व डॉ.प्रणोती राहुल जगताप, व्हा.चेअरमन ललिता बाळासाहेब उगले, संचालिका लताबाई एकनाथराव बारगुजे, इतर संचालक व महिलांच्या हस्ते शनिवार दि.2 रोजी करण्यात आले.

यावेळी डॉ.प्रणोती जगताप म्हणाल्या की, कारखान्याचे या वर्षीचे गाळप स्व.कुंडलीकराव तात्या जगताप यांच्या आशिर्वादाने सुरळीत चालू झाले आहे.शेतकर्‍यांचा कुकडी कारखान्यावर असलेल्या विश्‍वासावर सुरळीत सुरु झाले आहे. कुकडीचे संस्थापक सहा आकडा शुभ समजत आलेले होते. व योगायोगाने आज कारखान्याचे साखर उत्पादन 6 लाख 66 हजार 666 क्विंटल साखर पोती निर्मीतीचा हा मॅजिक आकडा पुर्ण झाल्याचे अवचित्त साधून साखर पुजन करण्याचा योग मला आला. कारखान्याचा 27 मेगावेट सहविजनिर्मिती प्रकल्प सुरळीत चालु झाला आहे. त्यामधुनही कारखान्याला व ऊस उत्पादक शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. कष्ट करणारा कधीही हारत नाही. हा तात्यांचा मंत्र होता. तो सर्वांनी जोपासला म्हणूनच अडचणींच्या काळात ही कारखाना सुस्थीतीत चालू आहे असे सांगितले.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड म्हणाले की, कारखान्याने या गळीत हंगामात आज अखेर 6,04,500 मे.टन गाळप करुन 66 लाख 8 हजार 150 साखर पोत्यांची निर्मीती केली आहे. कारखान्याने आजपर्यंतच्या गळीत हंगामाचा उच्चांक मोडून 7 लाख मे.टन गाळप करण्याचे उदिष्ट ठेवले असल्याचे सगितले. कुकडीचे माजी उपाध्यक्ष विश्‍वासराव थोरात यांनी उपस्थीत शेतकरी, सभासद, अधीकारी व कर्मचा-यांचे अभीनंदन केले. यावेळी माजी उपाध्यक्ष एकनाथराव बारगुजे संचालक अंकुश रोडे, प्रल्हाद इथापे, विनायकराव लगड, विवेक पवार, माजी संचालक किसनराव ओव्हळ, बाळासाहेब उगले, सुभाष काळोखे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, शेतकी अधिकारी सुभाष कुताळ, चिफ इंजिनिअर भास्कर काकडे, चिफ केमिस्ट गोपीनाथ पवार, चिफ अकौंटंट नारायण सरोदे, कल्याणराव जगताप, बंडोपंत धारकर, रामदास शेटे, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.