Breaking News

दिनकरराव टेकने यांचा 73 वा आभिष्टचिंतन सोहळा


भेंडे/प्रतिनिधी: आपल्या जिवनातील 42 वर्षांपासून सहकार महर्षींनी स्व मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेमध्ये मुख्यध्यापक ते आज मितीस प्रशासकीय अधिकारी या पदाची धुरा सांभाळत आहेत. दिनकरराव टेकने यांच्या 73 व्या आभिष्टचिंतन सोहळ्यात आनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

भेंडे ता.नेवासे येथील श्री मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी यांच्या 73 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नर्शीग कॉलेजचे प्राचार्य गणेश सिनगारे बोलत होते. पुढे म्हणाले टेकने यांच े73 वर्षाचे वय आसून देखील तरूणांना लाजवेल आशी त्यांच्या कामाची हातोटी बघून कोनताही तरुण लाजल्याशिवाय रहानार नाही असे ते म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे प्राचार्य आप्पाराव, शिक्षण शंस्थेचे समन्वयक प्रा.सासवडे, उप-प्राचार्य दिपक राऊत, पत्रकार नामदेव शिंदे, दिलावर शेख, रमेश पाडळे, पत्रकार सोनवने, प्रविण मांडे उपस्थित होते.