Breaking News

लोकअदालतीमध्ये 87 प्रकरणे निकालात


म्हसवड/ प्रतिनिध ी : म्हसवड न्यायालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 87 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

रविवार दि 17 मार्च 2019 रोजी म्हसवड न्यायालयात आदरणीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोेजन करण्यात आले होते. यावेळी न्यायालयातील दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रलंबित असलेली एकूण 477 प्रकरणे ठेवणेत आली होती. यातील दिवाणी 80 व फौजदारी 7 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. लोकअदालतमध्ये पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश जी. एम. कोल्हापुरे व सह दिवाणी न्यायाधीश पी. पी. जोशी  यांनी काम पाहिले. पंच म्हणून वकील संघाचे अध्यक्ष ऍड. के. पी. शेटे, ऍड. एम. डी. शहा, ऍड एन. एच. काझी, ऍड. एन. एल. दहिवडे यांनी काम पाहिले. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी म्हसवड वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी प्ररिश्रम घेतले.