Breaking News

राहुरीच्या विद्यामंदिर केंद्रात दहावीच्या परीक्षेसाठी 964 विद्यार्थी सहभागी


राहुरी/प्रतिनिधी: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे बोर्डामार्फत घेण्यात येणार्‍या इयत्ता 10 वीच्या परीक्षेला शुक्रवार पासून सुरवात झाली. राहुरी तालुक्यात 8 केंद्रात मोठ्या कडक बंदोबस्तात परीक्षा सुरू झाली असून राहुरी विद्यामंदिर केंद्रात 964 विद्यार्थी परीक्षेला सहभागी झाले आहे. 

राहुरी शहरातील केंद्र क्रमांक 2201 कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेत एकूण 964 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले आहे. या केंद्राचे उपकेंद्र प्रगती विद्यालय राहुरी हे आहे. परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून नामदेव खराडे हे काम पहात आहे. त्यांना सहाय्यक म्हणून कैलास अनाप शिरीष महमिने, राहुल जगताप, साधना सातभाई हे काम पहात आहे. सकाळी दहा वाजता मोठ्या कडक बंदोबस्तात स्काऊट गाईड विद्यार्थ्यां मार्फत विद्यार्थी वर्गात जाण्याअगोदर झाडा झडती घेण्यात आली. 

बोर्डाचा पहिलाच तसेच नवीन अभ्यासक्रमावर आधारित पेपर असल्याने विद्यार्थी बरोबर पालकही मानसिक तणावात पाहायला मिळत होते. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शाळेत सोडण्यासाठी पालकांनीही मोठी गर्दी केली होती. यावेळी परीक्षा आवारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.