Breaking News

बुमरा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज:कमिन्स


चेन्नई -भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमरा हा सध्या चर्चेत असून त्याचा खेळही अप्रतिम आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये धडकी भरवणारा सूर आहे. सध्याच्या घडीला तोविश्‍वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने केले.

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. कमिन्सनेच विजयी धाव घेतऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र बुमराने अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करताना 19 व्या षटकात दोन फलंदाजांना बाद करत सामनाभारताच्या बाजूने फिरवला होता. बुमराच्या त्या कामगिरीची कमिन्सने दिलखुलासपणे प्रशंसा केली आहे.

“बुमरा नक्कीच अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजी करण्याबरोबरच चेंडूचा अचूक टप्पा राखण्याची कलाही त्याला अवगत आहे. या दोन गोष्टी ज्यागोलंदाजाकडे असतात तो कोणत्याही फलंदाजाला आव्हान देऊ शकतो. खेळाचे उत्तम ज्ञान असल्यामुळेच बुमरा त्याने आखलेल्या व्यूहरचनेची अंमलबजावणीकरण्यात यशस्वी ठरत आहे,’’ असे 25 वर्षीय कमिन्स म्हणाला.

“क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये बुमराची प्रगती दिवसेंदिवस वाढतच असून आजच्या काळात विश्‍वातील सवरेत्कृष्ट गोलंदाजांमध्ये त्याची गणना हमखास केलीजाईल. त्याची गोलंदाजी पहायला चाहत्यांनाही आवडते,’’ असे कमिन्सने सांगितले.

याव्यतिरिक्त, पहिल्या लढतीत रोमहर्षक सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे दुसर्‍या लढतीत भारत जोमाने पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल, त्यामुळे सहकार्‍यांनी सावध व्हावे. अन्यथा भारतात पहिल्यांदाच ट्वेन्टी-20 मालिका विजय मिळवण्याची सुवर्णसंधी वाया जाईल, असा इशाराही कमिन्सने दिलाआहे.