Breaking News

प्रा. काळे यांची रयतच्या लाईफ वर्कर पदी निवड


जामखेड/ता. प्रतिनिधी

प्राचार्य संपत काळे यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर पदी निवड करण्यात आली. शालेय शिस्त, स्वच्छता, लोकसहभागातून इमारत बांधकामे, शाळेसाठीजागा, अदिवासी ग्रामीण व मागास भागात गुणवत्ता वाढ प्रकल्प आदी कार्यांमुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. संपत काळे यांनी १९९१ मध्ये रयत शिक्षणसंस्थेच्या आंबेगाव तालुक्यातील आसाणे येथे मुख्याध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली नंतर पारनेर तालुक्यातील जवळा, अळकुटी, अमळनेर, जामखेडआदी ठिकाणी काम पहिले. विद्यालयाची बिघडलेली शिस्त, इमारत बांधकाम, शालेय पोषण आहार हे आवाहने त्यांच्या समोर होते. या निवडीबद्दल त्यांचे माजीआ. दादाभाऊ कळमकर, चेअरमन नितीन गोलेकर, माजी जि.प.सदस्य प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, माजी सभापती राजेंद्र कोठारी,सकल मराठा समाजाचेसमन्वयक मंगेश आजबे, शरद कार्ले, जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.