Breaking News

'दक्ष मिञ' तर्फे पोलिस अधीक्षकांचा सत्कारनेवासेफाटा/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य गृह मंत्रालयाने राज्यातील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केला. त्यामध्ये नगरचे अधीक्षक रंजनकुमारशर्मा यांची बदली होऊन त्यांच्या जागी इशू सिंधू यांची नियुक्ती झाली.

या पार्श्वभूमीवर दक्ष मित्रचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे , जिल्हा महिला अध्यक्ष रेश्मा चांडक, नेवासे तालुकाध्यक्ष राजेंद्र नळघे, शेवगावचे बाळासाहेब काळकुंड, विजय दहीवाळकर आदींनी त्यांचा सत्कार करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.