Breaking News

काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची परंपरा - सत्यजीत तांबे


संगमनेर / प्रतिनिधी : युवक ही देशाची व राज्याची खरी ताकद आहे. युवकांच्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने राज्यात चलो पंचायत अभियानांतर्गत 25 हजारखेड्यांपर्यंत पोहचण्याचा संकल्प आहे. संगमनेरच्या प्रामाणिक व निष्ठावान राजकारणामुळे राज्यात संधी मिळाली असून खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालीकाँग्रेस पक्ष देशात पुन्हा उभारी घेईल,काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची परंपरा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेयांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना यावर्षीचा राजकारण विभागातील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यातआला. त्याबद्दल त्यांचा संगमनेर तालुक्याच्या वतीने यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव थोरात हे होते तर व्यासपीठावर इंद्रजीतभाऊ थोरात, अ‍ॅड.माधवराव कानवडे, भाऊसाहेब कुटे, लहानभाऊ गुंजाळ,लक्ष्मणराव कुटे, अजय फटांगरे, प्रकाश कलंत्री,सौ.सुहासिनी गुंजाळ,नुरमुहम्मद शेख,आर.एम.कातोरे, पांडुरंग पा.घुले, आर.बी.राहाणे, दत्तात्रय कोकणे, बाळासाहेबगुंजाळ, सुरेशराव थोरात, सुभाष सांगळे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात पुढे बोलताना तांबे म्हणाले कि, खा.राहूल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सध्या राज्यभर चलो पंचायतअभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमीत्ताने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेला भेटून त्यांच्यासोबत संवाद साधत आहे. तालुक्यातही विकासाचेचांगले काम सुरु आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या कामस्वरुपी निमंत्रीत सदस्य म्हणून निवड झाली हीसंपुर्ण तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याच्या सन्मानार्थ संगमनेर तालुक्याच्या वतीनेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजीराव थोरात, इंद्रजीतभाऊ थोरात, अ‍ॅड.माधवराव कानवडे, भाऊसाहेब कुटे, लहानभाऊ गुंजाळ आदी उपस्थितहोते.