Breaking News

आकाश अंबानीच्या लग्नात रोकडे यांचे बासरीवादन


अहमदनगर /प्रतिनिधी : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्‍लोका मेहता यांचा विवाह 8 व 9 मार्च 2019 रोजी होणार आहे. या लग्नाचे सर्व विधी मुंबईस्थित अंबानी निवास एंटिलिया हाऊसमध्ये होणार असून विवाह समांरभात अहमदनगरचे प्रसिद्ध बासरीवादक व संगीत दिग्दर्शक जितेंद्र रोकडे बासरीवादन करणार आहेत.

देशातील काही निवडक संगीतकारांना मुंबईतील या विवाह सोहळ्यात आपली कला सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून या कलाकारामध्ये त्यामध्ये श्री.रोकडे यांचा समावेश आहे.