बहिरोबावाडी येथे लांडग्यानी पाडला शेळीचा फडशा ----


पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी येथे सोमवारी दि.4 रोजी अशोक भिवाजी पवार हे त्यांच्या शेतात दु.4 वा. शेळ्या चारत असताना अचानकपणे लांडग्याने एका शेळीवर हल्ला चढवत शेळीच्या शरीराचा बहुतांश भाग खाऊन फस्त केला. दरम्यान पवार यांच्या हा प्रकार काही वेळाने लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा केल्याने लांडग्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. परंतु शेळीचा जीव मात्र गेला. आधीच दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून, त्यातच अशा घटनेमुळे तो पुरता कोलमडून गेला आहे. 

या घटनेमुळे बहिरोबावाडी येथील शेळीपालकांमध्ये प्रचंड चिंतेचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी वनविभागाचे वनरक्षक बढे व तिकोणे यांना भ्रमणध्वनीवरून दिली असून, या घटनेतील मृत शेळीचा पंचनामा करून संबंधित शेतकर्‍याला वनकायद्यातंर्गत प्रचलीत तरतुदीनुसार नुकसान भरपाई मिळावी. अशीही मागणी केली आहे. 

तसेच दुष्काळी परिस्थिती असुनही वनविभागाकडूून जंगली वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्याने जंगलातील हिंस्त्र प्राण्यांबरोबरच हरिण, ससे, मोर व अन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत निर्भयपणे येत आहेत. व त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या उपद्रवाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान यावेळी बोलताना बढे व तिकोणे यांनी सदर घटनेतील मृत शेळीचा पंचनामा मंगळवारी सकाळी करून अहवाल कार्यालयाकडे सादर करू तसेच वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भातील आपली मागणीही कार्यालयाला कळवू असे आश्‍वासन दिले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget