Breaking News

शिरूर-हवेलीच्या सर्वांगीन विकासासाठी कटीबध्द -आ.पाचर्णे


शिरूर/प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते वीज, सिंचनासह सर्व सोयी सुविधांनी मतदार संघ स्वयंपुर्ण करणार असून रस्त्यांच्या विविध कामांमुळे मतदार संघातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व वेगवान झाले आहे. शिरूर हवेली मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणल्याने अनेक विकास कामे मार्गी लागले आहे.
सर्वसामन्यांना केंद्र बिंदू मानून केंद्र व राज्य सरकरच्यावतीने राबविण्यात येणार्‍या अनेक लोकहिताच्या योजनांचा लाभ नागरीकांना मिळवून देण्यासाठी व त्याचबरोबर शिरूर हवेली मतदार संघाच्या विकासाचे ध्येय ठेऊन जास्तीत जास्त निधी आणून सर्वांगीन विकासासाठी कटीबद्ध असल्याचे मत शिरूर-हवेलीचे आ. बाबुराव पाचर्णे यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभा प्रसंगी सांगितले.

शिरूर तालुक्यातील सुमारे 41 कोटी रूपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आ. बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, जिल्हा संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, अरूण घावटे, नितीन पाचर्णे, संदिप गायकवाड, निलेश गाडेकर, दिलीप हिंगे, विठ्ठल घावटे, तुषार घावटे, सागर घावटे व आदी उपस्थित होते.

यावेळी म्हाळुंगी येथे सी.एस.आर.फंड व पीएमआरडीएच्या माध्यमातून 5 कोटी रूपयांचे काम, शिरूर शहरातील गुरूकुल हौसिंग सोसायटीतील 10 लाख रूपयांचे सभामंडपाचे उद्घाटन, शिरूर ग्रामीणमधील घोटीमळा रस्त्याच्या 1 कोटी 30 लाख रूपयांच्या विकास कामाचे भुमिपुजन, गोलेगाव येथील 10 लाख रूपयांच्या दावण मलिक रस्ता डांबरीकरण करणे, मोटेवाडीतील निमोणे ते मोटेवाडी रस्त्याचे 1 कोटी 58 लाख रूपयाचे डांबरीकरण, निमोणेत 4 कोटी 26 लाख रूपयांचा शिरूर-निमोणे-निर्वी रस्ता, गुणाट येथील 10 लाख रूपयांच्या श्री दत्त मंदिर चौक सुधारणा करणे, शिरगाव येथील 15 लाख रूपयांच्या स्मशानभुमिमी सुधारणा करणे, पिंपळसुटी येथे 10 लाख रूपयांच्या दशक्रिया घाट सुधारणा करणे, इनामगाव येथील 10 लाख रूपयांच्या सिध्देश्‍वर मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, इनामगाव ते मांडवगण फराटा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2 कोटी 47 लाख 34 हजार रूपयांच्या रस्त्याचे भुमिपुजन, 6 लाख रूपयांच्या शिवनगर अंतर्गत रस्ता करणे, तांदळीतील 22 कोटी 3 लाख रूपयांच्या तांदळी-इनामगाव अष्टविनायक मार्ग, 5 लाख रूपयांच्या श्री दत्त मंदिर सभागृह बांधणे, बाभुळसर येथील 5 लाख रूपयांच्या विठ्ठल मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, 5 लाख रूपयांच्या गणपती मंदिर सभागृह बांधणे, 3 लाख रूपयांच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे वाढीव कामाचे उद्घाटन करणे, मांडवगण फराटा येथील 10 लाख रूपयांच्या रामोशी समाज सभागृह बांधणे, सादलगावमध्ये 10 लाख रूपयांच्या चर्मकार समाज सभामंडप बाधणे, 4 कोटी रूपयांच्या सादलगाव - मांडवगण-वडगाव रासाई रस्ता करणे, कुरूळीतील 2 कोटी 14 लाख रूपयांच्या कुरूळी-निर्वी-मांडवगण रस्ता करणे, कोळगाव डोळस येथे 10 लाख रूपयांच्या स्मशानभुमी सुधारणा करण्याच्या कामाचा सुभारंभ, आंधळगाव (पांढरेवस्ती) येथील 1 कोटी 40 लाख रूपयांच्या आंधळगाव ते पांढरेवस्ती रस्त्याचे भुमिपूजन झाले.