Breaking News

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी


भेंडे/प्रतिनिधी
येथील डॉ.पुंड हास्पिटलमध्ये दीनमित्र वाचनालय, ज्ञानवैभव करिअर अ‍ॅकडमी आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

लयाप्रसंगी माजी सरपंच सुमनबाई काळे, डॉ.गायत्री पुंड, स्मिता काळे, आदिती तागड, भाग्यश्री फुलारी, पुजा सोनवणे, प्रियांका ढवळे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव कारभारी गरड, तालुकाध्यक्ष डॉ. रजनीकांत पुंड, पत्रकार बाळकृष्ण पुरोहित, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे, बाळासाहेब गायकवाड आदींसह नागरीक उपस्थित होते.