Breaking News

छावण्यांसाठीच्या जाचक अटी कमी करा - काकडे


पाथर्डी / प्रतिनिधी: तालुक्यातील एकूण ११३ गावांपैकी फक्त ३१ गावात चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तेथील गावातील जनावरे जवळपासच्या छावण्यात घेऊन जाताना व त्यांची निगा राखण्याकरिता शेतकर्‍यांना पायपीट करावी लागतआहे. शासनाने जाचक अटी घातल्यामुळे काही गावातील नागरिकांनी चारा छावण्यांचे प्रस्ताव टाकलेले नाही. त्या अटी कमी करून त्या गावातील छावण्यांना त्वरित मंजूरी देण्यात यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदाकाकडे यांनी केले.

तालुक्यातील शिवतीर्थ बहुउद्देशीय संस्था गोळेगाव, शिवशक्ती दूध उत्पादक संघ माळेगाव ने, शिवशक्ती दूध उत्पादक संघ अंतरवाली बु, ठाकूर निमगाव, येथील चारा छावण्यांवर काकडे यांनी भेट देऊन छावण्यांची पाहणी केली.यावेळी शेतकऱ्यांसोबत विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जगन्नाथ दादा गावडे, वसंत गव्हाणे, वासुदेव भिसे, संजय आंधळे, विजय साळवे, मधुकर नाना गावडे, विष्णू फडके, रंगनाथ आठरे, रामनाथ बिटाळ,बप्पासाहेब बर्डे, भागवत रासनकर, अर्जुन बर्डे, विकास आंधळे, लक्ष्‍मण गावडे, रामभाऊ कुलाळ उपस्थित होते.