Breaking News

कृषि विज्ञान केंद्रांनी विस्तार कार्यातून ओळख निर्माण करावी- डॉ. कोकाटे


राहुरी/प्रतिनिधी
भारतातील कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यपध्दतीचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेला आहे. शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पादन मिळून त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे कृषि विज्ञान केंद्रांचे उद्दिष्ट असले पाहिजे. कृषि विद्यापीठाच्या विकसीत तंत्रज्ञानाचीपडताळणी करून सुधारणा करणे आणि शेतक-यांच्या शेतावर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घेणे हे कृषि विज्ञान केंद्रांचे महत्वाचे कार्य आहे. पीक प्रात्येक्षिके आणिआद्यरेखा प्रात्येक्षिके हे कृषि विज्ञान केंद्राचे शक्तीस्थान आहे. शेतकरीभीमुख विस्तार कार्य करुन कृषि विज्ञान केंद्रांनी आपली ओळख निर्माण करावी असेप्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि कृषि तंत्रज्ञान अवलंबन संशोधन संस्था, विभाग-8, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 17 कृषि विज्ञान केंद्रांची दोन दिवसीय कृती कार्यशाळेचे उदघाटन डॉ. कोकाटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावरसंशोधन संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता (प.म.) डॉ. प्रकाश तुरबतमठ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ. शरद गडाख म्हणाले, विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार हे तीन प्रमुख कार्य आहे. शिक्षणामध्ये विद्यापीठ कृषि पदविकापासून तर आचार्य पदवीपर्यंत कृषि शिक्षण दिले जाते. विद्यापीठाद्वारे 120 पिकांवर संशोधन केले जातअसून यामध्ये 66 पिकांचे 255 वाण विकसीत केलेले आहेत. तसेच 1471 पीक तंत्रज्ञान शिफारसी प्रसारीत केलेल्या असून 35 कृषि यंत्र व अवजारे विकसीत केलेलेआहे. या दोन दिवसीय कार्यशाळेत कृषि विज्ञान केंद्रांचा मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्षाचे संशोधन व विस्ताराचे नियोजन निर्धारीत होणार आहे. डॉ. भगवानदेशमुख यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले.