Breaking News

चॅम्पियन्स कराटे कल्बच्या खेळाडूंचे उज्वल यश


सातारा/ प्रतिनिधी : ऑल इंडिया शोतोकान कराटे स्पर्धेत येथील चॅम्पियन्स कराटे कल्बच्या खेळाडूंनी दमदार यश मिळवले आहे.

नुकत्याच रायगड जिल्ह्यातील महाड या शहरात ऑल इंडिया शोतोकान कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा च्या खेळाडूंने आपल्या खेळाचे सुंदर असे प्रदर्शन करुन सर्वांचे मन जिंकले. स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स कराटे कल्ब साताराच्या एकूण 22 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. खेळाडूंना चांगल्याप्रकारे सामने जिंकून 16 सुवर्ण 7 रौप्य आणि 11 कांस्य पदकाची लयलूट केली. चॅम्पियन्स कराटे कल्बच्या उत्कृष्ट खेळाडूंनी काता आणि कुमिते या प्रकारात वर्चस्व गाजवून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन खिताब मिळविले 16 वर्षाखालील मुले प्रसाद अवखडे यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तसेच रोख 2500 रूपयांचे बक्षिस मिळविले 14 वर्षा खालील मुले साहित्य माने यांनीही 2500 रूपयांचे रोख बक्षीस आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, 10 वर्षा खालील मुली सिध्दी मोरे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि दीड हजार रूपयांचे रोख बक्षीस, 14 वर्षाखालील मुली ऐश्वर्या ढोके चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि दोन हजारांचे रोख बक्षीस मिळाले. 16 वर्षा खालील मुली वेदंातीका वाघ हिचा ही चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि 2500 रुपयाचे रोख बक्षीस मिळाले. याशिवाय दहा वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 1200 रूपयांचे रोख बक्षीस पटकावले. त्यात सिध्दी मोरे, रचना जगताप, जान्हवी कदम या खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेचे आयोजन महाडचे चिफ इन्सक्टर सेन्नई प्रसाद सावंत यांनी केले होते. स्पर्धेमधे 600 खेळाडू सहभाग नोंदवला होता. तसेच या स्पर्धेत दमन, गुजरात, मुंबई, सातारा, पुणे, येथून खेळाडू सहभागी झाले. सर्व यशस्वी खेळाडूंचे चॅम्पियन कराटे क्लब चे व्यवस्थापक सिंहान संतोष मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या प्रकारे उत्कृष्ट पणे खेळाडूंनी सादर केल्यामुळे सातारा जिल्ह्याला पहिली जनरल चॅम्पियन किताब मिळविला.