Breaking News

उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस पक्षात प्रवेश


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. बुधवारी अखेर अधिकृतरित्या उर्मिलाने पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या जेष्ठनेत्यांच्या उपस्थित तिने पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी उर्मिलाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली. आजच्या कार्यक्रमात उर्मिलाने पक्षात प्रवेश केला असला तरीही उमेदवारी जाहीर केली नाही.

उर्मिला मातोडंकरला उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्यात येणार असल्याची चर्चा रंगते आहे.निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष अभिनेत्यांचा वापर करते. मात्र मी फक्त निवडणुकासाठी पक्षात प्रवेश केला नाही तर लहानपणापासून माझ्या घरात काँग्रेसची विचारधारा होती. याविचार धारेमुळे मी काँग्रेसमध्ये आली. निवडणूक आहे म्हणून मी पक्षात प्रवेश करत नाही किंवा निवडणूक संपल्यावरही मी पक्षातून जाणार नाही.आपले संविधान हे इतर देशांच्या तुलनेत चांगले आहे. या संविधानात लोकशाहीसाठी स्थान आहे. काँग्रेस केंद्रात सत्तेत नसले तरीही मी काँग्रेसच्या पाठीशी आहे. उत्तर मुंबईतून भाजपविरोधात निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते फार उत्सूक नसल्याने एखाद्या कलाकारालाच मैदानात उतरविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे म्हटले जात आहे. 

मात्र, अद्याप तरी उर्मिलाने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.उर्मिला आज यासंबंधीच्या चर्चेसाठी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेणार असल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. मागील वेळी याच जागेसाठी काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांचा 4 लाख मतांने पराभव झाला होता. याच कारणामुळे उर्मिलाला या जागेसाठी उमेदवारी देण्याचा विचार केला जात आहे. मुंबईमध्ये उर्मिलाचे भरपूर चाहते आहेत. याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता असल्यानं तिला याठिकाणी उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. या पूर्वीही या मतदारसंघातून काँग्रेसनेअभिनेता गोविंदा यास उमेदवारी दिली होती. तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा त्यांनी पराभव केला होता.