Breaking News

भारतीय स्टेट बँकेतून आधुनिक व वेगवान सेवा : महाप्रबंधक


अहमदनगर / प्रतिनिधी : “संपूर्ण भारतात अग्रगण्य व मुख्य असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून आधुनिक व तत्पर सेवा ग्राहकांना मिळत असल्यामुळे बँकींग प्रणालीला वेग आला असून सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकरी, उद्योजक, व्यापारी, नोकरदार, मोठे कारखानदार यांच्यासाठीही योजना राबवत आहे, नव्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्टेट बँकेतून याहून अधिक वेगवान सेवा मिळतील’’, असे प्रतिपादन मुंबई परिमंडल-3 चे महाप्रबंधक देवेंद्रकुमार यांनी केले.

महाप्रबंधक देवेंद्रकुमार यांनी भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखा, एमआयडीसी शाखा, क्षेत्रिय व्यवसाय कार्यालय व सावेडी शाखेस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. एमआयडीसीमधील क्षेत्रिय व्यवसाय कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शाखांधिकार्‍यांशी महत्वाची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
यावेळी औरंगाबाद विभागाचे उपमहाप्रबंधक एस.बी.पल्ले, क्षेत्रिय प्रबंधक सुबेध चव्हाण आदींसह जिल्ह्यातील सर्व शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
शाखा व्यवस्थापकांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी मार्च एण्डमुळे कामास गती देण्याच्या सूचना करण्याबरोबरच प्रलंबित कामे पूर्ण करणे, थकीत कर्ज वसुली करुन एनपीए कमी करणे, शाखांमधील ठेवी वाढविणे, कर्जखाती वाढविणे आदींबाबत सूचना केल्या.