Breaking News

पुलवामा हल्ल्यातील सहभागाचे पुरावे नसल्याचे पाकचे स्पष्टीकरण

Image result for पाकचे स्पष्टीकरण

नवी दिल्लीः पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल पाकिस्तानचा नवा खोटारडेपणा समोर आला आहे. पाकिस्तानने म्हटले आहे, की पुलवामा हल्ल्यात त्यांचा हात असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. तसेच भारताने ज्या 22 जागांबद्दल सांगितले, त्या ठिकाणी कोणताही दहशतवादी तळ आढळला नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

भारताला जर या ठिकाणी पाहणी करायची असेल, तर पाकिस्तान यासाठी परवानगी देण्यास तयार असल्याचेही पाकने म्हटले आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी 54 जणांची चौकशी सुरू आहे; मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच यापुढे जी माहिती मिळेल ती भारताला देण्यात येईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या बातमीनुसार, भारताने दिलेल्या पुराव्याने पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध सिद्ध होत नाही. भारताकडे आणखी काही पुरावे असतील तर द्यावेत. त्याबद्दल चौकशी करून कारवाई करण्यास पाकिस्तान तयार आहे.

दरम्यान, भारताने दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाला 27 फेब्रुवारीला पुलावामा हल्ल्याशी संबंधित कागदपत्रे सोपवली होती. भारताने यामध्ये हल्ल्याशी ‘जैश ए मोहम्मद’चा संबंध असल्याचे पुरावे दिले होते. त्यानंतर पाकिस्तानात ‘जैश’चे तळ आणि त्यांच्या म्होरक्याच्या वास्तव्याचे पुरावेही भारताने दिले होते.