Breaking News

दानपेटी लिलावातून आलेला निधी हुतात्म्यांना


नंदुरबार: जिल्ह्यातील दोंडाईचा येथील सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संतशिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्तदानपेटीचा लिलावाचा निधी पुलवामा घटनेतील शहिदांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पालखीच्या मिरवणुकीत आलेल्या दानपेटीचा लिलाव करण्यात आला.लिलाव ऋषीकेश सराफ यांनी घेतला. हे पैसे पुलवामा येथील हुतात्मा जवानांना पाठवण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वीर जवानांना श्रद्धांजलीवाहण्यात आली होती.