Breaking News

एसटी व मोटारसायकलच्या धडकेत एक ठार


शेवगाव/प्रतिनिधी: एसटी व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊण झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटणा शुक्रवारी शेवगाव शहरात झाली असींन आवडाभरातला हा तिसरा बळी आहे. नाशीक शेवगाव ही बस शेवगावकडे येताना समोरूण मोटारसायकल क्रमांक एम.एच.16 एक्स 6541 ही जोहरापुरकडे जात असताणा शुक्रवार दि.1 रोजी सांयकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान नेवासे राज्यमार्गावर सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहासमोर या दोन वाहणांची समोरासमोर धडक होऊण अपघात झाला. 

या अपघातात मोटारसायकलस्वार अभिमन्यु बाबासाहेब केदार वय 30 रा.लोळेगाव हा जागीच ठार झाला. शहरात क्रांती चौकात अपघातात दोघांचा बळी गेल्यानंतर आठवडाभरात अभिमन्यु हा तिसरा अपघाती बळी ठरला आहे.