Breaking News

पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाने शेतीची प्रगती साधावी- कोकाटे


राहुरी: अशक्यप्राय गोष्टी शक्य करून विविध प्रयोग केले पाहिजेत.पाण्याची सध्याची परिस्थिती पाहता पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेतीची प्रगती शेतकऱ्यानेसाधली पाहिजे असे प्रतिपादन डॉ. कोकाटे यांनी केले.

डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराचेउदघाटन डॉ. किरण कोकाटे, यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. संभाजी पठारे, प्राचार्य रामदास धुमाळ, कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अण्णासाहेब शिंदे , सुमन राजेंद्र कोळसे, डॉ. महाविरसिंग चौहाण, प्रा. दिलीप गायकवाड , प्रा. मुकुंद गुंड, कार्यक्रमअधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. प्रविण कदम, राजेंद्र कोळसे, सचिन कोळसे आदी उपस्थित होते.

प्रा. मुकुंद गुंड यांनी शिबीराच्या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यामध्ये शिबिरादरम्यान करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.

डॉ. दिलीप पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात केले पाहिजे जेणेकरुन ते समाजाप्रती आपले योगदान देवू शकतात.साफसफाई करतांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी व लोकांची मानसीकता बदलण्यासाठी ग्रामस्थांना माहिती द्या. गावासाठी आठवड्यातून किमान दोन तासस्वच्छतेसाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज गावंडे व अमर ननावरे यांनी केले तर सौरभ रंगाटे यांनी आभार मानले.