Breaking News

अवैध दारू विक्री ठिकाणांवर छापे


राजूर/ प्रतिनिधी: राजूर पोलीसांनी अवैध धंद्यांवर छापे टाकत धडक कारवाई केली. यात देशी,विदेशी दारू, मडक्यातील मुद्देमाल व पाच आरोपी ताब्यात घेतले आहेत.

राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध दारू विक्री व इतर धंद्यांवर पोलीसांनी पोलीसअधीक्षक इशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली छापे टाकले. यामध्ये येथील हॉटेल संकेत सह चार ठिकाणी धडक कारवाई केली. यात अवैध मुद्देमाल हस्तगत केला. रात्री उशिरा पर्यंत पंचनामा करण्याचे काम चालू होते. कारवाईत हेमंत सुभाष येलमामे (वय ३६ वर्षे ) अर्जुन विठ्ठल शिरसाठ (वय ३३ वर्षे ) ,मच्छिंद्र वामन भांगरे (वय ३५ वर्षे ) राजू माधव नाईकवाडी (वय २५ वर्षे ) संजय अदालतनाथ शुक्ला (वय ३३ वर्षे ) आदींना ताब्यात घेतले आहे.

राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी,उपसहाय्यक पोलीस निरीक्षक निमसे,पो.हे.कॉ.प्रवीण थोरात,दत्तात्रय जपे,विजय मुंढे,रावसाहेब कदम,नितीन सोनवणे,चालक पांडुरंग पटेकर,तळपे,केकान,गाढे आदींनी हि कारवाई केली.

कारवाई कागदोपत्री?

राजूर व परिसरात २००५ साली ग्रामसभेत दारू बंदी करण्यात आली होती. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या आधीही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या धाडसत्रांत यातले काही आरोपी पकडले गेले. परंतु त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. मागे झालेल्या कारवायांवरून त्यांच्यावर कसलाही वाचक बसला नाही. आता झालेली कारवाई हि कागदोपत्रीच राहणार का? कि हे अवैध धंदे बंद होणार असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.