Breaking News

विचार शरीर मन हे व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित असते - सुमित गुणवंत.


निघोज/प्रतिनिधी: कविता ही कविच्या जीवनानुभवाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. ती कागदावर लिहिली की, वाचकांची होऊन जाते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी सुमित गुणवंत यांनी केले. निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. 

या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी सुमित गुणवंत व कवी विशाल शेरे यांनी सामाजिक आशयाच्या व प्रेम कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मनोहर एरंडे हे होते. याप्रसंगी मराठी अभिमान गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच कुसुमाग्रज यांच्या जीवनपटावर आधारित ध्वनीचित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. यावेळी मनोहर एरंडे म्हणाले की, साहित्य हे संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. आपण त्या भाषेतूनच आपले विचार व भावना व्यक्त करत असतो. त्या भाषेचा गौरव व्हावा या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून मराठी विभागाने आयोजित केलेला उपक्रम निश्‍चितच स्तुत्य आहे. असेही ते म्हणाले.

या प्रसंगी कोमल बोचरे या विद्यार्थीनीने आपली कविता सादर केली. डॉ. गोविंद