Breaking News

खिंडवाडीच्या युवकाची दीड लाखाची फसणवूक


सातारा / प्रतिनिधी : अवसायानात निघालेल्या एका सोसायटीने शिंदेवाडी ता. सातारा येथील एका युवकाची 1 लाख 66 हजार 578 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असून याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रतापगंज पेठेतील अवसायानात निघालेल्या एका मल्टी सोसायटीच्या व्यवस्थापकाने जास्त व्याजाचे अमिष दाखवून खिंडवाडी ता. सातारा येथील एका युवकाला सप्टेबर 2017 मध्ये 1 लाख 66 हजार578 रुपयांची ठेवपावती करण्यास सांगितले. ठेवीची मुदत संपल्यानंतर युवकाने त्या व्यवस्थापकाकडे पैशाची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्याने सदर युवकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.