Breaking News

हेमलता भाटे यांना आदर्श माता पुरस्कार


कराड / प्रतिनिधी : येथील पावसकर गल्लीतील राधा महिला मंडळातर्फे हेमलता भाटे यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. महिला दिना सप्ताहानिमित्त मंडळाच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात आदर्श माता पुरस्काराने भाटे यांना गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमास नगरसेविका विद्या पावसकर, रूपा पावसकर, श्रावणी घळसासी, राधिका बेळवनकर, शुभांगी जाधव, नीता सपकाळ, रोहिणी शिंदे, नम्रता पावसकर, सुप्रिया पावसकर, सारिका मालंडकर, सारिका काळे, नंदिनी शिंदे, निकिता पाटील, राधिका घळसासी, पूनम शानभाग, प्रिया कुलकर्णी, स्मिता पावसकर आदी उपस्थित होत्या.